गुहागर तालुक्यातील तरुणांची विरारमध्ये रिक्षा चालक संघटना स्थापन

0

गुहागर : तालुक्यातील तरुण नोकरी उद्योगासाठी मुंबई शहर तसेच आजूबाजूच्या परिसरात राहत आहेत. त्यातील काहींनी चांगली नोकरी न मिळाल्याने रिक्षा व्यवसाय सुरू केला. त्यांनी संघटनाही स्थापन केली आहे. दिवस-रात्र प्रामाणिकपणे व्यवसाय करायचा आणि आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करताना गाव, समाज यांच्या विविध कार्यक्रमांत सहभाग घेतला जातो. गावाकडचे प्रेम कधीही न विसरणारा चाकरमानी आज मुंबई शहरात एकत्र येऊ पाहत आहे. विरार शहरात वर्षानुवर्षे प्रामाणिक रिक्षा व्यवसाय करणारा गुहागरकर रिक्षा संघटनेच्या माध्यमातून एकत्र आला आहे. तालुक्यातील ४६ रिक्षा व्यावसायिक यात सहभागी झाले आहेत. चिंद्रावळे गावातील सुपुत्र हेमंत भडवळकर यांनी आपल्या रिक्षेवर गुहागर असे नाव लिहिले होते. यातून व्यवसाय करीत असताना गुहागर नाव पाहिल्यावर इतर रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये आपल्या गुहागर तालुक्याबद्दल आदर निर्माण झाला आणि सर्वांनी संघटित होण्याचे ठरवले. यात काही चिपळूण तालुक्यातीलही तरुण सहभागी झाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:55 PM 15-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here