ते चोरटे अखेर जेरबंद!

0

रत्नागिरी: दोन दिवसांपूर्वी परकार हॉस्पिटलजवळ लॅपटॉपच्या होलसेलरला चाकूचा धाक दाखवून लक्षावधीचा किमती ऐवज चोरणाऱ्या टोळीला सांगलीतून अवघ्या चोवीस तासांत रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी ही माहिती दिली. रत्नागिरीच्या आरोग्य मंदिर परिसरात अष्टविनायक संकुलात हा प्रकार रविवारी घडला होता. व्यंकटेश सिस्टीम फर्ममधील तरुणाच्या तोंडाला चिकटटेप बांधून आणि त्याला दोरीने जखडून ठेवून १७ लाख ७१ हजार रुपये किमतीचे लॅपटॉप, मॅनिटर, हेडफोन, डीव्हीआर अशा ऐवजाची जबरी चोरी करून चोरट्यांनी पोबारा केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here