विठोबाची वार्षिक नगरप्रदक्षिणा बुधवारी

0

रत्नागिरी : येथील विठ्ठल मंदिरातील विठोबाची वार्षिक नगरप्रदक्षिणा बुधवार, दि. १७ रोजी दुपारी १२ वाजता मंदिरातून सुरू होणार आहे. कार्तिकी एकादशीनंतर नगर प्रदक्षिणेसंदर्भात विठ्ठल मंदिर संस्थेने माहिती दिली आहे. नगर प्रदक्षिणेत कोरोनाविषयक शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळायचे आहेत, असे आवाहन संस्थेने केले आहे. नगरप्रदक्षिणा गोखले नाका, धनजीनाका, गवळीवाडा, पोलिस मुख्यालय, जेलनाका, गोगटे कॉलेज, जिल्हा न्यायालय, श्री काशिविश्वेश्वर मंदिर, राजिवडा, खडपेवठार, तेली आळी तळे, चवंडेवठार, पाटील वाडी, श्री दत्त मंदिर, घुडेवठार, मांडवी नाा, मायनाकवाडी, भैरव मंदिर येथे पोहोचेल. तिथून ८० फुटी हायवेवरून काळा समुद्र, समुद्रस्नान करण्यात येईल. त्यानंतर कुरणवाडी, भाटकरवाडी, श्री सांब मंदिर, जोतिबा मंदिर, श्रीराम मंदिर, पेठकिल्ला, चिंचनाका, मुरुगवाडा, ग्रामदैवत श्री भैरी मंदिर, पांढरा समुद्र, विलणकर सहाणेवर, मिऱ्यारोड पांढरासमुद्र, परटवणे, श्री भार्गवराम मंदिर, सावंतवठार, फगरवठार, वरचा फगर वठार, खेरबाग, डाफळेवाडी, डीएसपी बंगला, आंबेडकरनगर, दर्गा, धनजीनाका, परत श्री विठ्ठल मंदिरात पालखी येईल. या दिंडी सहभागी होताना भाविकांनी कोरोनाविषयक सर्व नियम पाळण्याचे आवाहन श्री विठ्ठल मंदिर संस्थेने केले आहे. याशिवाय विठ्ठल मंदिरात प्रतीवर्षाप्रमाणे गुरुवार, दि. १८ रोजी सायंकाळी सूर्यास्तावेळी त्रिपूर पाजळला जाणार आहे. या वेळी त्रिपूरपूजन करण्यात येणार आहे. कार्तिकोत्सवात समाप्तीची काकड आरती २० रोजी सकाळी होईल. त्यानंतर महापूजा ९.३० वाजता, भोवत्या होऊन कार्तिकोत्सवाची सांगता येईल.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:42 AM 16-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here