मंडणगड मध्ये विशेष ग्रामसभेतून निवडणुकीबाबत कार्यक्रम

0

मंडणगड : तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायातीमध्ये मंगळवार १६ नोव्हेंबर २०२१ रोजी मतदार नोंदणी व अनुषांगिक बाबींकरिता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा होणार असल्याची माहिती तहसीलदार दत्तात्रेय बेर्डे यांनी दिली आहे. या ग्रामसभेसाठी सर्व बी. एल. ओ. यांनी ग्रामपंचायत कार्यालयात राहून मतदार यादी, मतदार नोंदणी, नमुना, ६,७,८, व ७ अ घेऊन उपस्थित रहावयाचे आहे. ग्रामसभेमध्ये मतदार नोंदणी प्रक्रीया व निवडणुकीबाबत नागरिकांना मार्गदर्शन करुन मतदार यादीचे वाचन करावयाचे आहे. तसेच मतदार वगळणी, दरुस्ती, स्थलांतर नोंदणी इत्यादी बाबतचे नमुना अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. तसेच मतदारांना व्होटर हेल्पलाईन अँप डाऊनलोड करणे व त्या द्वारे नोंदणी आर्ज कसे भरावे याबाबतचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:49 AM 16-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here