गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार

0

चिपळूण : राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे पदाधिकारी व म्हाडाचे अधिकारी यांच्या बैठकीत गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्यात आला आहे. या संदर्भात एमएमआरडीएकडून लवकरच घरांची सोडत काढली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे गिरणी कामगारांतून समाधान व्यक्त होत आहे. गिरणी कामगरांच्या रखडलेल्या घरांच्या प्रश्नावर गिरणी कामगार संयुक्त कृती संघटनांचे नेते आणि म्हाडाचे मुख्य अधिकारी यांची वांद्रे कार्यालयातील गुलजारीलाल नंदा सभागृहात शुक्रवारी बैठक पार पडली. म्हाडाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे, सहउपमुख्य अधिकारी श्री. गालांडे, म्हाडाचे इंजिनीयर एमएमआरडीएचे आधिकारी यासह कृती संघटनेचे नेते जयप्रकाश भिलारे, निवृत्ती देसाई, प्रवीण घाग, नंदू पारकर, बजरंग चव्हाण, प्रविण येरुणकर, लक्ष्मिकांत पाटील, बबन गावडे यांनी चर्चेत सहभाग घेतला. एम.एम.आर.डी.ए.च्या ठाणे, पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील ५० टक्के घरे गिरणी कामगारांना हस्तांतरित करण्याच्या निर्णयाचे राष्ट्रीय मिल मजदूर संघाद्वारे जोरदार स्वागत करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:51 PM 16-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here