महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते डॉ. य. बा. दळवी गौरव ग्रंथ ‘आजकालचा महाराष्ट्र’ याचे प्रकाशन ओरोस येथे स्थानिक खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले. ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी आमदार डॉ. य. बा. दळवी हे 19 फेब्रुवारी रोजी 95 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्याचे औचित्य साधून त्यासाठी स्थापन केलेल्या डॉ. दळवी गौरव ग्रंथ समितीने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
