कोकणात नर्सिंगचे अद्ययावत शिक्षण देण्याचे काम दि यश फाऊंडेशनचे नर्सिंग कॉलेज करत आहे. भविष्यात विद्याथ्यांसाठी येत्या जूनपासून १०० बेडचे चांगल्या हॉस्टेलचे बांधकाम चालू करण्यात येणार आहे. तसेच स्पोर्ट कॉम्प्लेक्स, लॅबोरेटरी सुरू करण्यात येणार आहे. तसेच पॉलीक्लिनिकही चालू करण्याकरिता प्रयत्न आहे, असे प्रतिपादन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्थ तथा माजी आमदार बाळ माने यांनी केले.
