नाणारच्या समर्थनार्थ उतरलेल्या शिवसैनिकांना दाखवला घरचा रस्ता

0

नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असून हा विरोध कायम राहणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी कोकण दौऱ्यादरम्यान म्हटलं होतं. मात्र यानंतर लगेचच काही शिवसैनिक प्रकल्पाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. त्यामुळे प्रकल्पाबद्दल शिवसेनेची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न निर्माण झाला. या प्रकरणाची पक्षानं गंभीर दखल घेतली आहे. सागवे येथील शिवसेना विभागप्रमुख राजा काजवे यांची उचलबांगडी केली आहे. याशिवाय त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांचीदेखील हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. नाणार प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी (१७ फेब्रुवारी) शिवसेनेचे काही पदाधिकारी आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरले. या प्रकरणी विभागप्रमुख राजा काजवे यांची हकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्या जागी कमलाकर कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काजवे यांच्यासह शिवसेनेचे इतरही पदाधिकारी प्रकल्पाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. त्यांच्याबद्दलचा अहवाल पक्षाकडून मागवण्यात आला आहे. त्यांच्यावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here