तळवली विभागात महावितरणबाबत नाराजी

0

शृंगारतळी : महावितरणच्या तळवली विभागात १३ गावे असून सुमारे ५६०० ग्राहक आहेत. या गावांमधील ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करणे, विजेबाबतची कामे व इतर ग्राहकांना भासणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी या भागात दाबेराव या अभियंत्यांची नियुक्ती केली. मात्र, त्यांच्याकडून विजेबाबतची कामे वेळेवर होत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे.
ग्राहकांकडून वीजमीटर पैसे भरून घेणे, मात्र वीजजोडणी देण्यासाठी टाळाटाळ करणे, विजेबाबत काही समस्या असल्यास त्या न सोडवणे, ग्राहकांशी उद्धटपणे बोलणे असे प्रकार या अधिकाऱ्यांकडून घडत आहेत. बऱ्याचदा त्यांचा मोबाईल कधी बंद, तर कधी नॉट रिचेबल लागतो. ग्राहकांनी वेळोवेळी वरिष्ठांकडे तक्रारी करूनही त्यांना हे अधिकारी जुमानत नाहीत, असे ग्राहकांचे मत आहे. एकूणच ग्राहकांच्या विजेबाबतच्या समस्या सोडवण्यासाठी या अधिकाऱ्याचा उपयोग होत नसल्याने त्यांची येथून बदली करावी व नवीन अधिकारी नेमावा, अशी मागणी या विभागातून होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:45 PM 17-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here