सन 2021-22 मध्ये महषी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बीसीए महाविद्यालयाच्या 6 विद्यार्थिनींची Deloitte कंपनीमध्ये निवड

0

रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लीकेशन्स फॉर वुमेन (बी.सी.ए.) शिरगाव, रत्नागिरी येथील टी.वाय.बी.सी.ए. च्या विद्यार्थिनीसाठी मागील बारा वर्षापासून कॅम्पस प्लेसमेंट अंर्तगत विप्रो, इन्फोसिस, कॉग्नीझंट, टीसीएस, अँटॉस, पटनी व Deloitte इ.बहुराष्ट्रीय कंपनींच्या इन्टरव्हयुवचे आयोजन करण्यात येते. पुणे येथील के.बी. जोशी इन्स्टिटयूट ऑफ आयटी (बी.सी.ए.) यांच्या संयुक्त विद्यमाने Deloitte या कंपनीच्या कॅम्पस इंटरव्हयूचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बी.सी.ए. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या. Deloitte तर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाईन लेखी व इंटरव्हयू परिक्षेतून टी.वाय.पी.सी.ए. च्या कु. सुखदा विडू, कु.शाद मुजावर, कु.इक्रा अलसुलकर, कु.अलिजा निवेकर, कु.युक्ता कापडी व कु.अमृता मोरे या विद्यार्थिनींची निवड झाली. गेली दीड वर्ष कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे सगळयांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. या परिस्थितीमध्ये देखील बीसीए कॉलेजच्या विद्यार्थिनींना कॅम्प्स इन्टरव्हयु मार्फत नामवंत कंपन्यांमध्ये नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. या विद्यार्थिनींना बी.सी.ए. महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या कु.स्नेहा कोतवडेकर, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफीसर स.प्रा.केतन पाथरे व सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींनी मिळविलेल्या यशाबद्दल रत्नागिरी प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख मा.श्री.मंदार सांवतदेसाई तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:14 PM 17-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here