अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

0

रत्नागिरी: नाचणे-आयटीआयजवळ एसटी बसस्टॉप येथे सायकल लावून उभ्या असलेल्या प्रौढाला अज्ञात वाहनाने धडक दिली. अज्ञात वाहन चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उमेश रमेश सावंत (वय ४०, रा. भैरी जुगाई मंदिर-टेंभ्ये, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. नाचणे येथून मारुती मंदिरकडे येत असताना अज्ञात वाहन चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून मयत उमेश सावंत यांच्या सायकलला धडक देवून पलायन केले. यात उमेश गंभीर जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here