वीज कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

0

चिपळूण : वीज कंपन्यांच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ वीज कामगार संघटनांनी बेमुदत निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. १६ पासून निषेध सभा, निदर्शने सुरू करण्यात आली आहेत. कामगार संघटना व व्यवस्थापनाचे बदली धोरण, बढतीसंदर्भात महावितरणने केलेला भंग, महापारेषण कंपनीत इच्छुक कर्मचाऱ्यांच्या बदल्या न केल्यामुळे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने १८ नोव्हेंबरपर्यंत काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतला आहे, तर २२ पासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार आहे. महावितरणच्या येथील कार्यालयासमोर द्वारसभा घेणे, काळ्या फिती लावून काम करणे व २२ पासून उपोषण अशी आंदोलनाची दिशा असेल. आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा, कार्याध्यक्ष सी. एन. देशमुख, सरचिटणीस कृष्णा भोयर, महेश जोतराव यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:33 AM 18-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here