दापोली : एसटी आगारातील कर्मचारी हे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे संप मिटण्यासाठी आणखी किती दिवस लागतील, याचा अंदाजही व्यक्त करणे अवघड झाले आहे. वाहक, चालक संपावर असल्याने सर्वच फेऱ्या ठप्प झाल्या आहेत. दररोज दापोली आगाराचे उत्पन्न ७ लाख रुपये इतके आहे. या संपामुळे दापोली आगाराला २७ लाखांचे नुकसान झाले आहे. दापोली आगारात प्रशासकीय अधिकारी मिळून ३६६ कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, यातील प्रशासकीय अधिकारी सोडता ८५ टक्के कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:59 AM 18-Nov-21