केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २६ नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर; शरद पवारांचे निमंत्रण नाकारले?

0

पुणे : भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २६ नोव्हेंबरला शुक्रवारी पुण्यात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत गणेश क्रिडा कला मंच, स्वारगेट येथे पुणे शहर भाजप कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांना पुणे भेटीचे निमंत्रण दिले होते. पवारांच्या या निमंत्रणावरून शाह पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला भेट देणार होते. परंतु अमित शाह यांच्या दौऱ्यामध्ये इन्स्टिट्यूटला भेट देण्याचा उल्लेख नसल्याचे एका वृत्तवाहिनीने सांगितले आहे.

”या मेळाव्याच्या तयारीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांची विविध व्यवस्था आणि नियोजन बैठकही घेण्यात आली. १८ नोव्हेंबरपासून पुढील चार दिवस मंडलनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांमध्ये स्थानिक आमदार, मंडल अध्यक्ष, शहर पदाधिकारी आणि नगरसेवक मार्गदर्शन करतील. त्यानंतर चार दिवसांत मंडलनिहाय पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, शक्ती केंद्रप्रमुख, बूथप्रमुख आणि बूथ समिती सदस्यांच्या बैठका होणार आहेत,’ अशी माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले आहे.”

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांना पुणे भेटीचे निमंत्रण दिले होते. शाह यांच्याकडे सहकार खाते आल्याने सहकार खात्याशी संबंधित मुद्यांबाबत ही भेट होती. त्यात महाराष्ट्रातील साखर कारखानदारीवरही चर्चा होणार असल्याचे समजले होते. शाह यांनी सुद्धा या भेटीला होकार दर्शवला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कही लढवले जात होते. पण अमित शाह यांनी निमंत्रण नाकारल्याचे समोर येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:07 PM 18-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here