रत्नागिरी जिल्हा बँकेच्या 7 जागांसाठी आज मतदान

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सात जागांसाठी आज शुक्रवारी (ता. १९) सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. यापूर्वी सहकार पॅनेलचे २१ पैकी १४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मतमोजणी २१ नोव्हेंबरला जिल्हा नगर वाचनालयात होणार आहे. बँकेच्या निवडणुकीत सहकारचे जिल्हा उपनिबंधक डॉ.सोपान शिंदे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहात आहेत. विमुक्त जाती, भटक्या जमाती मतदारसंघातून सहकार पॅनेलचे सुरेश मारूती कांबळे विरूद्ध सचिन चंद्रकांत बाईत अशी लढत होणार असून ९९६ मतदारांची नोंद आहे. मजूर संस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे दिनकर गणपत मोहिते विरूद्ध राकेश श्रीपत जाधव यांच्यात लढत होणार असून १०० मतदार आहेत. नागरी पतसंस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे संजय राजाराम रेडीज विरूद्ध सुजित भागोजी झिमण यांच्यात लढत होणार असून १२६ मतदार आहेत. दुग्धसंस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे गणेश यशवंत लाखण विरूद्ध अजित रमेश यशवंतराव यांच्यात चुरशीची लढत शक्य आहे. या मतदारसंघात ३६ मतदार आहेत. रत्नागिरी तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे गजानन कमलाकर पाटील विरूद्ध प्रल्हाद महादेव शेट्ये यांच्यात लढत होणार असून ४४ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. लांजा तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे आदेश दत्तात्रय आंबुलकर विरूद्ध महेश रवींद्र खामकर यांच्यात लढत होणार असून ३४ मतदार आहेत. गुहागर तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे अनिल विठ्ठल जोशी विरूद्ध चंद्रकांत धोंडू बाईत यांच्यात होणार्‍या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी २१ मतदार विजेता ठरवतील.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:04 AM 19-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here