छत्रपती फाऊंडेशनतर्फे अमेरिकेत गेले 7 वर्षे शिवजयंती साजरी होत आहे. यावर्षी हिंदुस्थान सरकारचे वाणिज्य दूतावास आणि अल्बानी ढोल ताशा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कलाकारांनी शिवजन्म, शिवराज्यभिषेक असे प्रयोग सादर केले आणि तबला व वीणासह सांस्कृतिक संगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी मुख्य पाहुणे म्हणून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेशजी बाघेल उपस्थित होते. मुख्यमंत्र्यानी शिवाजी महाराजांना अभिवादन करत त्यांच्या कार्याचा गौरव करत आदरांजली वाहिली. सातासमुद्रापार आपण इतक्या मोठया प्रमाणावर शिवजयंती साजरी केल्याबद्दल त्यांनी छत्रपती फाऊंडेशन व Consulate of India in New York यांचे कौतुक केले.
