लांजा नगर पंचायतची सर्वसाधारण सभा ऑफलाईन होणार

0

लांजा : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून नगर पंचायतमध्ये होणारी सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने सुरु झाली. ऑनलाईन होणाऱ्या सभेमध्ये काही तांत्रिक अडचणी येत असल्याने सभा ऑफलाईन घ्यावी, अशी मागणी भाजप गटनेते संजय यादव यांनी मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याकडे केली होती, त्या मागणीला यश आले आहे. ऑनलाईन पद्धतीने होत असलेल्या सर्वसाधारण सभेमुळे तांत्रिक अडचणींना समोरे जावे लागते. मोबाईल नेटवर्कमुळे काही वेळा प्रश्न मांडताना किंवा प्रश्नांची उत्तरे देताना अडचणी येत असतात त्यामुळे माहिती अर्धवट स्वरूपाची मिळते. विकासकामांविषयी मांडलेला विषय पूर्ण करता येत नाही. ऑनलाईन सभेमध्ये ठराविक वेळ मिळत असल्याने चुकीच्या कामाबद्दल जास्त बोलणे होत नसल्याने सत्ताधारी पक्षांना पळवाट काढणे सोयीस्कर झाले आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना दिसत असून सर्वच स्तरावर शिथिलता देण्यात येत आहे. राज्यामध्ये सर्वत्र अधिवेशन
ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या सर्व सभा सभागृहामध्ये होत आहेत, मग लांजा नगर पंचायत सभागृहामध्ये सर्वसाधारण सभा का होत नाही? नगर पंचायतमध्ये सभा होणे यात गैर काहीही नाही. त्यामुळे
ऑनलाईन सभा बंद करुन ऑफलाईन घ्यावी, अशी मागणी भाजप गटनेते संजय यादव यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्याच पार्श्वभूमीवर यादव यांनी आक्रमक होत केलेल्या मागणीची तत्काळ दखल घेत ऑफलाईन सभा घेण्याचे परिपत्रक न.पं.कडून काढले आहे. त्यानुसार लांजा नगर पंचायतची पुढील सर्वसाधारण सभा ही ऑफलाईन पद्धतीने दि. २२ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे न.पं. प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. ऑनलाईन सभेमध्ये तांत्रिक अडचणी येऊ लागल्याने विकासात्मक विषयांची चर्चा व्यवस्थित झाली नव्हती. गेल्या काही महिन्यानंतर पुन्हा एकदा नगर पंचायतमधील सर्वसाधारण सभा गाजणार तसेच ऑफलाईन सर्वसाधारण सभेमध्ये अपूर्ण राहिलेले विकासात्मक विषय पूर्ण केले जातील, असे यावेळी यादव यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:23 PM 19-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here