माळनाका येथील स्कायवॉक वर शालेय विद्यार्थ्यांचे अश्लील चाळे

0

प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी रत्नागिरी येथील जुना माळ नाका येथे स्कायवॉक बांधण्यात आला. मात्र याच स्कायवॉक वर शालेय विद्यार्थ्यांचा अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ आता समोर आला आहे. येथून जवळच असणाऱ्या एका शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या व्हिडीओ मध्ये अश्लील चाळे करताना दिसत आहेत. अशा घटना नेहमीच घडतात असे बोलले जात आहे. या स्कायवॉक वर एक मोठे बॅनर लावण्यात आले असून याच्या आडोशाला उभे राहून अनेक वेळा असे चाळे केले जातात असे देखील बोलले जात आहे. परिसरातील नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली असून या व्हिडीओतील विद्यार्थ्यांना वेळीच समज द्यावी अशी मागणी होत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here