संप सोडून रविवारी दिवसभरात ४,१४४ एसटी कर्मचारी कामावर हजर

0

मुंबई : गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. मात्र, आता राज्यभरात एसटी बसेस काही प्रमाणात रस्त्यावर धावायला लागल्या आहेत. रविवारी ४९ मार्गावर १४९ बसेस धावल्या असून, ४६१९ प्रवाशांनी प्रवास केला आहे. याशिवाय कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असून, आज ४१४४ कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहे. दरम्यान, अनेक कर्मचाऱ्यांना रविवारची सुटी असल्याने हजर कर्मचाऱ्यांची ४१४४ इतकी संख्या आहे. एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यभरातून ४९ मार्गावर, शिवनेरी, शिवशाही आणि साध्या अशा एकूण १६७ बसेस धावल्या आहेत.
विलीनीकरणाच्या मागणीसाठी दहा हजारहुन अधिक एसटी कर्मचारी आझाद मैदानात ठिय्या मांडून बसले आहेत. रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे हाल झाले. दरम्यान तंबू ठोकू दिला नसल्याने जास्त त्रास होत असल्याचे आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:23 PM 22-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here