भाजपा देवरूख शहर कार्यकारिणीची आज बैठक

0

देवरूख : भारतीय जनता पक्षाच्या देवरूख शहर शाखेची बैठक आज (दि. २२ नोव्हेंबर) आयोजित करण्यात आली आहे. नगर पंचायत नगर रचना प्रभागांच्या निमित्ताने होणारी ही बैठक चिंतामणी मंगल कार्यालयात सायंकाळी ६.३० वाजता सुरू होईल. सभेत देवरुखमधील बूथ रचना अध्यक्ष, समितीविषयी माहिती देणे, आवश्यक असल्यास बदल करणे, देवरूख शहर कार्यकारणी आणि विविध विभाग निश्चित करून इच्छुकांची नावे घेणे, केंद्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार, प्रसार आणि लाभ मिळवून देणे, भाजपशासित देवरूख नगरपंचायतीच्या कार्यकाळातील विकासकामांची माहिती देणे, उर्वरित कालावधीत विकासकामांचा आराखडा ठरवणे, भाजप कार्यकर्ता सादरीकरण उपक्रम ठरवणे, संघटना वाढ आणि मजबूत करण्यासाठी विविध उपाययोजना करणे, आगामी नगरपंचायत निवडणूक रणनिती ठरवणे या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. बैठकीला कार्यकर्ता बंधू भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप देवरूख शहराध्यक्ष सुशांत मुळ्ये यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:39 PM 22-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here