खेड : शिवाजी महाराजाचे दैवतीकरण थांबवून त्याचे विचार समाजात रुजवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन हेदलीगावचे उप संरपच यांनी जय हनुमान मित्र मंडळ हेदली यांनी आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवामध्ये बोलत होते. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती रत्नागिरीचे कार्याध्यक्ष सचिन गोवळकर, हेदली गावचे तंटामुक्त अध्यक्ष राजू घाणेकर, माजी सभापती शांताराम चिनकटे, हेदली गावच्या ग्राम पंचायत समिती सदस्य दामिनी मेंगडे, महिला मंडळ अध्यक्षा सुगंधा चिनकटे, शंकर बडबे, मंगेश चिनकटे, राकेश मेंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री. संजय गोवळकर म्हणाले की,शिवाजी महाराजाचे दैवतीकरण सुरू आहे. हे दैवतीकरण बंद करुन शिवाजी महाराजाचे समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, हे विचार समाजात रुजवणे गरजेचे आहे. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री. सचिन गोवळकर म्हणाले की, शिवाजी महाराज हे विज्ञाननिष्ठ राजे होते. त्यांनी अनेक गड किल्ले जिंकले त्याच्या मोहिमा ह्या आमवस्या च्या रात्री असत. त्यांनी गड किल्ल्यांना कधी लिंबू मिरची बांधली नाही. हाच वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून समाजाने वाटचाल केली पाहिजे. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री. शांताराम चिनकटे हे म्हणाले की, शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्थान आहे. हिच प्रेरणा आम्हाला जगण्याचे बळ देते. मंडळाचे अध्यक्ष संदिप गोवळकर याच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम हे मंडळ राबवत असते. या जयंतीचे अवचित्त साधून मंडळाने रयतेचा राजा शिवाजी राजा या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नियती गोवळकर, द्वितीय क्रमांक प्रणव बडबे, तृतीय क्रमांक आर्यन चिनकटे, उत्तेजनार्थ अक्षरा कुळे, रिया मेंगडे हिने पटकावला. त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन व अभार प्रदर्शन मंडळाचे सचिव संदिप बडबे यांनी केले या वेळी गावातील ग्रामस्थ व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
