ग्रामदैवत श्री भैरी मंदिरात महाशिवरात्र उत्सव सोहळ्याचे आयोजन

0

रत्नागिरी: बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी मंदिरात शुक्रवारी (ता. 21) महाशिवरात्र उत्सव सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजता बारावाड्यांचे वतीने तृणबिंदूकेश्‍वर देवावर अभिषेक, पूजा, आरती होईल. त्यानंतर प्रसादाचे वाटप होईल. सकाळपासून रत्नागिरीतील भजनी मंडळाच्या भजनांचे आयोजन केले आहे. वेळ, भजन मंडळाचे नाव व बुवांचे नाव या क्रमाने- सकाळी 9 वाजता लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, पोमेंडी बुवा रोशन ढवण, 11 वाजता श्री स्वामी समर्थ प्रासादीक भजन मंडळ, बुवा नरेश सावंतदेसाई, पाली-मराठवाडी, दुपारी 1 वाजता काळीश्री जुगाई महिला भजन मंडळ, देवरुख बुवा ऋतुजा टाकळे, दुपारी 3.30 वाजता किर्तन – महाशिवरात्र उत्सव बुवा नाना जोशी, सायं. 5 वाजता श्री दुर्गामाता भगिनी भजन मंडळ, कर्ला, बुवा सीमा शेट्ये, सायं. 6.30 वाजता श्री जय हनुमान प्रासादिक मंडळ, कोतवडे बुवा विजय मयेकर, रात्रौ 9 वाजता श्री जय भैरव भजन मंडळ, मुरुगवाडा, बुवा अजय पिलणकर, रात्री 10 वाजता श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ, घुडेवाडी बुवा साईनाथ नागवेकर व सुदेश नागवेकर.
त्यानंतर रात्री पालखी प्रदक्षिणा होऊन आरती झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. या सोहळ्याला ग्रामस्थ, भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा प्रसादाचा व भजनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री देव भैरी देवस्थानचे विश्‍वस्त अध्यक्ष रविंद्र तथा मुन्ना सुर्वे यांनी केले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here