पाटपन्हाळे येथे डंपर-कार अपघात; दोघेजण जखमी

0

गुहागर : शृंगारतळीकडून गुहागरकडे येणाऱ्या डंपर आणि चारचाकी यांचा पाटपन्हाळे येथील पुलावर अपघात झाला. पुलाचे काम अर्धवट असल्याने डंपरने वेग कमी केला. त्यावेळी मागून येणारे वाहन डंपरच्या खाली घुसले. या अपघातात दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे. दि. २२ नोव्हेंबरला सायंकाळी हा अपघात झाला. हा अपघात २२ नोव्हेंबरला सायंकाळी ३.४५ च्या सुमारास झाला. श्रृंगारतळीकडून गुहागरच्या दिशेने सुभानअल्ला ट्रान्सपोर्ट कंपनीचा डंपर येत होता. या डंपर मागे मुंबई विले पार्ले येथून गुहागर वरचापाटकडे इको कार जात होती. ही गाडी अभिजीत रमेश मुरमुरे चालवत होते. उतार असल्याने गाडी वेगात होती. कारवरील नियंत्रण सुटल्याने ती डंपर खाली शिरल्याने हा अपघात झाला. अपघातग्रस्त कारमध्ये चालकासह १ पुरुष व २ महिला होत्या. ही मंडळी दुर्गादेवीवाडीवरील शांताराम जांगळी यांच्या घरी जात होती. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. समोर बसलेला चालक आणि पुरुष यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:27 PM 24-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here