चिपळूणात आजपासून झी टॉकीज पुरस्कृत ‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’

0

चिपळूण : तालुक्यातील टेरव येथील जय भवानी-वाघजाई मंदिरात झी टॉकीज पुरस्कृत ‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’ हा कार्यक्रम दि. २० व २१ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार दि. २० फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तर शुक्रवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रिकीकरण झी टॉकीज मार्फत होणार आहे. तरी या संधीचा ग्रामस्थ व वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here