गांजा बाळगल्याप्रकरणी चौघांच्या कोठडीत वाढ

0

रत्नागिरी : बेकायदेशीरपणे सुमारे २० हजार रुपये किंमतीचा गांजा हा अमली पदार्थ जवळ बाळगल्या प्रकरणातील ४ संशयितांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने मंगळवारी दोन दिवसांची वाढ केली. बिलाल शेख (२०, रा.मच्छीमार्केट, रत्नागिरी), सलमान कोतवडेकर (२८, रा.खडप मोहल्ला मिरकरवाडा, रत्नागिरी), संजय राणा (१९)आणि रामलाल राणा (१८, दोन्ही मुळ रा.नेपाळ सध्या रा.मिरकरवाडा) अशी पोलिस कोठडीत वाढ करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. शुक्रवार १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वा. यातील संशयित हे मच्छीमार्केट येथील खान कॉम्पलेक्सच्या पार्किंगमध्ये ६६७ ग्रॅम वजनाचा गांजा बाळगून असताना शहर पोलिसांतर्फे ही कारवाई करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. मंगळवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता संशयितांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:20 PM 24-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here