महाराष्ट्र सरकारनं शेजारच्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा अभ्यास करावा : शरद पवार

0

सातारा : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत अद्यापही तोडगा निघालेला नाही. याबाबत सरकारसोबत आंदोलक कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक सुरु आहे. दुसरीकडे याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. एसटी आंदोलनावर बोलताना शरद पवार म्हणाले की, म्हणाले की, एसटी महामंडळाची स्थिती वाईट आहे. याआधी एसटी महामंडळाला सरकारच्या मदतीची गरज भासली नव्हती. एसटीबाबत सर्वसामान्यांचं मतही महत्वाचं आहे. एसटीचं विलिनीकरण केल्यावर अनेक मंडळांचं विलिनीकरण करावं लागेल, असंही पवार म्हणाले. महाराष्ट्र सरकारनं शेजारच्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा अभ्यास करावा, असंही पवार म्हणाले. विलिनीकरणाचा मुद्दा कोर्टात प्रलंबित असल्यानं त्यावर बोलणार नाही. मात्र एसटीचा संप चर्चेतून सुटू शकतो, असंही ते म्हणाले. आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये मेळाव्याचं आयोजन केलं होतं. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते.

त्यांनी म्हटलं की, एसटी विभागाची आढावा बैठक घेतली नाही. मात्र एक बैठक घेतली होती. या बैठकीत काही पर्याय सुचवले होते. याआधी एसटी महामंडळाला सरकारच्या मदतीची गरज भासली नव्हती. 500 कोटी रुपयांची मदत ही राज्य सरकारने पगारासाठी मदत केली होती. पाच राज्यांच्या वेतनाचा विचार केला तर गुजरातमधील वेतन महाराष्ट्रापेक्षा कमी आहे आणि इतर राज्यात जास्त आहे. त्यामुळं यात काही मार्गे काढता येईल का हा एक विषय आहे, असंही ते म्हणाले. पवार म्हणाले की, या आंदोलनाने युनियनचे अधिकार ठेवले नाहीत. त्यामुळे करार करताना नेमका कोणाशी करावा हा प्रश्न आहे, असंही ते म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:30 PM 24-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here