शहरातील सर्व टपऱ्या हटवण्यासाठी नगर प्रशासनाला भाग पाडा – भाजपा जिल्हाध्यक्ष

0

रत्नागिरी: रत्नागिरी शहरात झालेलं टपऱ्यांचं साम्राज्य शहराचं स्वरूप बकाल बनवत आहे. अनेक अडचणी या टपऱ्या अनधिकृतपणे उभ्या असल्याने नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. या टपऱ्या तात्काळ हटवण्यासाठी bjp नगरसेवकांनी नागरप्रशासनाला बाध्य करावे, त्यासाठी आक्रमक भूमिका घ्यावी असा सज्जड आदेश भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी bjp नगरसेवकांना दिला काल झालेल्या जनरल सभेसंदर्भाने आढावा घेताना अश्या सूचना नगरसेवकांना पटवर्धन यांनी दिल्या. नगरपरिषदेत काल मनमानी पद्धतीने मंजूर केलेल्या तारांगण या विषयावर जिल्हाधिकारी यांचेकडे दाद मागा असे आदेश पटवर्धन यांनी नगरसेवकांना दिले. सर्व bjp नगरसेवकांना एक आचारसंहिता लवकर ठरवून देऊ असे पटवर्धन म्हणाले. नगरसेवकांनी जनतेच्या प्रश्नावर पाठपुरावा करत आक्रमक भूमिका घ्यावी, पार्टी या बाबत नगरसेवकांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असा आश्वासक पाठिंबा नगरसेवकाना देण्यात आला. रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा रस्ते ड्रेनेज आदी नागरी सुविधा बाबत आग्रही सजग राहून काम करण्याचे धोरण ठरवण्यात आले. या वेळी पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here