Breaking एसटी संप : अनिल परब आणि उदय सामंत यांची पत्रकार परिषद

0

➡️ एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ, संप मागे घेण्याची परिवहन मंत्र्यांची विनंती

➡️ संपातून तोडगा काढण्यात ना. उदय सामंत यांची मोठी भूमिका

मुंबई : परीवहन मंत्री अनिल परब आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबतची बैठक संपवुन आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी एच एन रिलायंन्स हाँस्पिटलमध्ये गेले होते. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मंत्री अनिल परब आणि उदय सामंत यांची या प्रकरणी विस्तृत चर्चा झाली आहे. आता सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद घेऊन सरकारची भूमिका मांडली आहे.

◾गेल्या १४ दिवसांपासून एसटी कामगारांचा संप चालू आहे
◾उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार समिती जो निर्णय घेईल तो सरकारला मान्य
◾कर्मचार्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय, मुल पगारात करण्यात येणार वाढ
◾चर्चेमध्ये तिढा सोडवण्यासाठी ना. उदय सामंत यांची महत्वाची भूमिका
◾१ ते १० वर्ष सेवा बजावणाऱ्या कर्मचार्यांच्या मूळ वेतनात ५००० ची वाढ, ४१ टक्के करण्यात आली वाढ
◾१० ते २० वर्षापर्यंत सेवा बजावलेल्या कर्मचार्यांच्या मुल वेतनात ४००० ची वाढ आता त्यांचा पगार २८८०० रुपये होणार
◾२० वर्षांपेक्षा जास्त सेवा असणाऱ्या कर्मचार्यांना आता ४१००० पगार मिळणार
◾कर्मचार्यांच्या मूळ पगारात भरगोस वाढ
◾दिवसभराच्या चर्चेतील फलित
◾राज्य शासनाने कोरोना काळात २७०० कोटींची रक्कम पगारासाठी दिले
◾एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आता यापुढे प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपूर्वी होणार
◾एसटीचे उत्पन्न वाढलं तर कर्मचार्यांना प्रोत्साहनपर भत्ता मिळणार
◾राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे मोठे मार्गदर्शन
◾संप मागे घेण्याची करण्यात आली विनंती
◾कामगारांनी लवकरात लवकर कामावर रुजू व्हावे
◾तत्काळ हजर होणार्या कामगारांचे निलंबन रद्द करण्यात येणार

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
06:47 PM 24/Nov/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here