रत्नागिरी, देवरूखच्या विठ्ठल मंदिरात पुन्हा प्रवचन उपक्रमाला सुरुवात

0

रत्नागिरी : गेल्या वर्षीच्या खंडानंतर रत्नागिरी आणि देवरूखमधील विठ्ठल मंदिरातील प्रवचन उपक्रमाला पुन्हा सुरुवात होत असून रत्नागिरीसह देवरूख येथेही हा उपक्रम होणार आहे. पहिले प्रवचन डॉ. जोत्स्नाताई पाटणकर यांचे होणार आहे. रत्नागिरीतील नीला पालकर, ज्योत्स्नाताई पाटणकर आणि त्यांच्या काही सहकारी मैत्रिणींनी मिळून हा उपक्रम पाच वर्षे चालवला होता. करोना काळात त्यात खंड पडला. आता हा उपक्रम रत्नागिरीसह देवरूख येथेही नव्याने सुरू होत आहे. रत्नागिरीत हा उपक्रम ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत दररोज संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत होणार आहे. देवरूच्या मधल्या आळीतील विठ्ठल मंदिरात ३ ते ५ डिसेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ६ ते ७ या वेळेत प्रवचन होणार आहे. डॉ. जोत्स्नाताई पाटणकर ‘शंकराचार्यांचे प्रातःस्मरण स्तोत्र’ या विषयावर बोलणार आहेत. रत्नागिरीतील पहिल्या रेडिओलॉजिस्ट म्हणून १५ वर्षे काम केल्यानंतर त्यांनी व्यवसायातून निवृत्ती घेतली आणि त्या अध्यात्माकडे वळल्या. पपू डॉ. श्रीकृष्ण देशमुख ऊर्फ डॉ. काका यांचा त्यांनी सन १९८९ मध्ये अनुग्रह घेतला. सद्गुरु डॉ. काका यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांत ग्रंथ, भगवद्गीता, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, आद्य शंकराचार्य परंपरेचा त्यांनी शास्त्रशुद्ध अभ्यास केला आहे. मधुसूदन सरस्वती यांच्या सुप्रसिद्ध भक्तिरसायन ग्रंथावर त्यांनी मराठीत विस्तृत टीका केली आहे. पत्राद्वारे दासबोध अभ्यास आणि समर्थ विद्यापीठाच्या परीक्षा दिल्या आहेत. आता त्या समीक्षकाचे काम करतात. विविध आध्यात्मिक मासिकात त्यांचे लिखाण सुरू असून त्या आध्यात्मिक मार्गदर्शनसुद्धा करतात. डॉ. पाटणकर यांनी याही पूर्वी या उपक्रमात प्रवचने केली आहेत. नव्याने सुरू होणाऱ्या प्रवचन उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन या उपक्रमाच्या संयोजिका डॉ. निशिगंधा पोंक्षे, सौ. गौरी ढवळे आणि देवरूखच्या सौ. वेदा प्रभुदेसाई यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:04 AM 25-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here