राज्यात भाजपला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे सरकार आले. तर दुसरीकडे मात्र हे महाविकास आघाडी फार दिवस टिकर नाही, असे विरोधकांकडून बोलले जात असताना ‘जोपर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एकमत आहे, तोपर्यंत महाविकास आघाडीचे सरकार टिकेल,’ असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘राज्यातील तरुणांनी महाविकास आघाडीवर मोठा विश्वास टाकला आहे. त्यांचा अपेक्षाभंग कधीच होऊ देणार नाही. तसेच नोकर भरती आणि स्थानिक प्रकल्पांमध्ये स्थानिकांना प्राधान्य याकडे लक्ष दिले जाईल,’ अशी माहिती त्यांनी दिली. तसेच राज्यातील कोणत्याही घटकावर अन्याय अत्याचार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. शेतकरी कर्जमाफी योजना व त्यामधील दोन लाख खालील शेतकरी, त्यावरील व नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच निर्णय घेतला जाणार आहे,’ असे पवार म्हणाले. दरम्यान, राज्यात लवकरच 8 हजार पोलिसांची भरती केली जाणार असून महसूल, उद्योग, जलसंपदा, महसूल पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण विभागातील भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे,’ अशी माहिती त्यांनी यावेळी येथे बोलताना दिली.
