शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एनसीसीच्या माध्यमातून शिस्तीचे धडे मिळतात. परंतु एनसीसीचे परिपूर्ण प्रशिक्षण मिळावे यासाठी रत्नागिरीत एनसीसी अॅकॅडमी सुरू करण्याचा प्रयत्न आहे. या संदर्भात ना. उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे भविष्यात रत्नागिरीत एनसीसी अॅकॅडमी उभी राहील, असे प्रतिपादन कोल्हापूर ग्रुप कमांडर ब्रिगेडिअर आर. बी. डोग्र यांनी व्यक्त केले.
