अखेर फडणवीसाना जमीन मंजूर!

0

२०१४ साली निवडणुक अर्जाच्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्हे लपवल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जामीन मंजूर झालाय. मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर देवेंद्र फडणवीस हजर झाले. ऍड. सतीश उके यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. निवडणूकीच्या प्रतिज्ञापत्रात आरोप लपवल्याप्रकरणी आज नागपुरात प्रथम श्रेणी न्यायलयात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस हजर झाले. याप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरू झाली. 2014 च्या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात फडणवीसांनी दोन गुन्हे लपवल्याचा आरोप आहे. तक्रारदार एडव्होकेट सतीश उके यांनी प्रथम श्रेणी आणि उच्च न्यायालय या दोन्ही ठिकाणी याचिका केल्या होत्या. त्या फेटाळण्यात आल्या. त्यानंतर उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं प्रकरण प्रथम श्रेणी न्यायालयात प्रकरण वर्ग केलं आहे.याप्रकरणी गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीवेळी फडणवीस अनुपस्थिती होते.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here