रत्नागिरी: स्टरलाईट कंपनीच्या ताब्यात असलेली झाडगाव एमआयडीसीतील सुमारे ६५३ एकर जमीन लवकरच एमआयडीसीच्या ताब्यात मिळणार आहे. ही जागा ताब्यात घेऊन मरीन पार्क किंवा मँगो पार्कसारखे प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न आहे. सिंधुदुर्ग येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या आढावा बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. गेली २८ वर्षे कंपनीच्या ताब्यात असलेली ही जागा एमआयडीसीकडे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
