ममता बॅनर्जींचा महाराष्ट्र दौरा निश्चित; उद्धव ठाकरे, शरद पवारांची घेणार भेट

0

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नुकताच तीन दिवसांचा दिल्ली दौरा केल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांची नजर महाराष्ट्राकडेही लागली आहे. येत्या ३० नोव्हेंबर रोजी ममता बॅनर्जी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत दाखल होणार आहेत. आपल्या या दौऱ्यात त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय. ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत ममता बॅनर्जी महाराष्ट्रात असतील.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:51 PM 25-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here