कसोटी पदार्पणात श्रेयस अय्यरचं अर्धशतक

0

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्कवर खेळला जातोय. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदापर्ण करणाऱ्या श्रेयस अय्यरनं अर्धशतकं करून भारताचा डाव सावलाय. श्रेयस अय्यर सध्या मैदानात उपस्थित असून भारताला मोठ्या धावसंख्याकडं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. तर, दुसऱ्या बाजूला अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाही संयमी खेळी करत त्याला साथ देतोय. श्रेय्यस अय्यरनं 2017 मध्ये भारताकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं श्रीलंकाविरुद्ध धर्मशाला येथे पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. त्याचदरम्यान, श्रेयस अय्यर कसोटीमध्ये पदापर्ण करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर त्याला मार्चमध्ये विराट कोहलीच्या दुखापतीनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार होतं. परंतु अजिंक्य रहाणे अतिरिक्त गोलंदाज घेऊन मैदानात उतरला. श्रेयस अय्यरला पहिली कसोटी खेळण्यासाठी चार वर्षे प्रतीक्षा करावी लागली. त्या मालिकेपूर्वी अय्यरनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात नाबाद द्विशतक झळकावलं होतं.

भारतीय संघ-
शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव

न्यूझीलंड संघ-
टॉम लॅथम, विल यंग, ​​केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), रचिन रवींद्र, काइल जेमिसन, टिम साउथी, एजाझ पटेल, विल्यम सोमरविले

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:20 PM 25-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here