चिपळूण : चिपळूण येथील लेखिका संध्या साठे-जोशी यांच्या ‘लॉकडाउन’ या पहिल्या कथासंग्रहाचे प्रकाशन येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात येत्या शनिवारी (दि. २७ नोव्हेंबर) होणार आहे. पुण्याच्या दिलीपराज प्रकाशनाने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. करोनाप्रतिबंधक लॉकडाउनच्या काळातील मानवी व्यवहारांची नोंद घेतलेल्या पाच कथा या संग्रहात आहेत. विविध विषय हाताळलेल्या आणि काही कोकणची पार्श्वभूमी लाभलेल्या एकूण २३ कथांचा हा संग्रह आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशन सोहळा शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता वाचनालयातील सुरेश बेहेरे कलादालनात होणार आहे. डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. सुवर्णा पाटील यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी दिलीपराज प्रकाशनाचे संचालक राजीव बर्वे असतील. या सोहळ्याला साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन मसाप चिपळूणचे अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे व कोमसाप चिपळूणच्या अध्यक्षा डॉ. रेखा देशपांडे यांनी केले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:14 PM 25-Nov-21