शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा ‘ॲक्शन मोड’वर; मंत्रिमंडळ बैठकीत ऑनलाइन उपस्थिती

0

गुरूवारी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. विशेष म्हणजे या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एच.एन.रिलायन्स रुग्णालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांच्यावतीने मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. “या आजारपणात आपण सर्व जण सहकार्य करीत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली फिजीओथेरपी व्यवस्थित सुरू आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत कोविड परिस्थिती, लसीकरण, पीक पाणी परिस्थिती आदी विषयांवर चर्चा झाली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी संपासंदर्भात राज्य शासनाने उचललेल्या पावलांची माहिती मंत्रिमंडळाला दिली.
कोविड परिस्थिती युरोपमध्ये बिकट होत असून आपण देखील महाराष्ट्रात पुरेशी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे, कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच चाचण्या वाढवाव्यात. कोविडचा धोका पूर्णपणे गेलेला नाही त्यामुळे आरोग्याचे नियम पाळण्यासाठी सर्वानी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:54 PM 25-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here