जिल्ह्यात 7 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

0

रत्नागिरी : आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 710 अहवालांपैकी 7 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत 43 रुग्ण उपचारखाली आहेत. जिल्ह्यात 24 तासात 5 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 76 हजार 541 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 96.80 टक्के आहे. नव्याने 7 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 79 हजार 68 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 484 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.14 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 24 तर संस्थात्मक विलीगिकरणात 19 रुग्ण उपचार घेत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:53 PM 25-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here