भाजपाच्या कार्यपद्धतीवर विश्वासून मनीष डोईफोडे व सहकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

0

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील प्रभाग क्र.६ मधील युवा कार्यकर्ते श्री.मनीष डोईफोडे यांनी आज भा.ज.पा. प्रवेश केला. भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी आज श्री.मनीष डोईफोडे यांना भा.ज.पा मध्ये सहभागी करून घेतले. याप्रसंगी शहराध्यक्ष श्री.सचिन करमरकर, नगरसेवक श्री. उमेश कुलकर्णी, शहर सरचिटणीस बाबू सुर्वे, युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री.विक्रांत जैन हे उपस्थित होते. श्री.मनीष डोईफोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भा.ज.पामध्ये प्रवेश केल्याने एक उमदे युवा व्यक्तिमत्व भा.ज.पा प्रवाहात सामील झाले. ही खूप उत्स्फूर्त घटना आहे. समाजमानसाचा कानोसा यातून घेता येईल. बहुजन समाजातील हा युवा कार्यकर्ता उच्चशिक्षित असून व्यावसायिक आहे. भा.ज.पा रत्नागिरी संघटनेला श्री.मनीष डोईफोडेच्या प्रवेशामुळे अधिकच बळ प्राप्त होईल अशी स्वागतपर प्रतिक्रिया ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली. श्री. नरेंद्र मोदी यांचे धडाडीचे नेतृत्व, केंद्र शासनाने घेतलेले धडाडीचे निर्णय देशाचे प्रभुत्व वाढवण्याची तळमळ या सर्वांचा प्रभाव माझ्यावर आहे. भाज.पा.पक्ष, भाजपा नेतृत्व हेच देशाचा विकास साधण्यास सक्षम आहे. या दृढ विश्वासावर आपण भाजपा प्रवेश केला, अशी श्री.मनीष डोईफोडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:13 PM 26-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here