लोटे येथील युवा सेनेतर्फे उद्या रक्तदान शिबीर

0

खेड : लोटे येथील युवासेनेच्या वतीने दि. २७ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत लोटेमाळ केंद्रीयशाळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन आमदार भास्कर जाधव, आमदार योगेश कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत होणार आहे. कोरोना काळात अनेक सामाजिक संस्थांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. युवासेनेच्या माध्यमातूनही रक्तदान शिबिरे आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपली जात आहे. याचाच भाग म्हणून लोटेमाळे येथे रक्तदान शिबिर होत आहे. यावेळी जिल्हाप्रमुख सचिन कदम, युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, तालुकाप्रमुख विजय जाधव, जि.प. सदस्य अरुण कदम, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, जि.प. सदस्य अरुण चव्हाण,सुनील मोरे, उपतालका प्रमुख विजय साळुखे, महेश गोवळकर यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिबिरात सहभागी होण्यासाठी चेतन वारणकर, डॉ. मच्छिंद्र गोवळकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:56 PM 26-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here