‘नावेद-2’चा शोध घेण्यासाठी सोनार यंत्रणा वापरणार : पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते

0

रत्नागिरी : जयगड समुद्रात बुडालेल्या नावेद-2 या मच्छिमार नौकेचा शोध सुरु आहे. बुडालेली नौका शोधण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नौदलाचीही मदत घेणार असून सोनार प्रणालीचा उपयोग करून बुडालेली नौका कुठे आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. थोडा वेळ लागेल पण आम्ही नक्कीच शोध घेऊ, जयगड बंदरात जी नौका होती ती अन्य कुठे गेलेली नाही तर गोव्याला गेली आहे. आमचे त्या नौकेवरही लक्ष आहे असे कोकण परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोकण परिक्षेत्राचे पोलोस उपमहानिरीक्षक रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले असता शुक्रवारी पत्रकार परिषदेत कोकण परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते यांनी जिल्ह्याचा आढावा दिला. जिल्ह्यातील गुन्ह्यांची संख्या 1350 झाली असून वर्षअखेर तो 1500 पर्यंत पोहोचेल. गुन्हे उकल होण्याचे प्रमाण पूर्वी 95 टक्के होते ते आता 80 टक्के झाले आहे. चोरी आणि प्रॉपटीचे गुन्हे उघड होण्याचे प्रमाण 20 ते 30 टक्क्याच्या घरात आहे. संपूर्ण देशात हे प्रमाण खूप कमी आहे. सध्या पोलिसांची संख्या कमी आहे. अलिकडेच 66 पोलिसांची भरती झाली आहे त्या पोलिसांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम रत्नागिरी पोलीस दल उत्तमरित्या बजावत आहेत. आयकॉपसारखा चांगला उपक्रम रत्नागिरी पोलीसानी राबवला. कोरोनाच्या काळात रत्नागिरी पोलिसांनी चांगली कामगिरी केल्याचे कौतुक संजय मोहिते यांनी केले. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी रत्नागिरीमध्ये एक ट्रेनिंग सेंटर सुरू केले आहे. या ट्रेनिंग सेंटरमध्ये पालघरपासूनचे अंमलदार ट्रेनिंग घेऊ शकतात असे मोहिते यांनी सांगितले. जिल्ह्यात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचा मानस जिल्हा पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चारशे ते साडेचारशे सीसीटिव्ही जिल्हा प्रशासनाने बसवले आहेत. सीसीटीव्ही बसवल्यानंतर त्याचा फायदा पोलीसांना होणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले. रत्नागिरी पोलीसांसाठी रत्नागिरी पोलीस मुख्यालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांचा 155 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. जयगड समुद्रात बुडालेल्या नावेद-2 या मच्छिमार नौकेचा शोध सुरु आहे. नौका कुठल्या भागात बुडाली हे ही आता निश्चित झाले आहे. नौकेवरचा जीपीएस सुरु असता तर आपल्याला ही माहिती मिळाली असती मात्र त्या नौकेवरचा जीपीएस सुरु नव्हता. जी दुसरी नौका होती तिचा जीपीएस आम्ही घेतला आहे पण एकाचा जीपीएस घेऊन भागणार नाही. दुसरी नौका कुठे होती हे ही तपासणे महत्वाचे आहे. सध्या पोलिसांचा तपास सुरु असून लवकरच त्याबाबत माहिती देऊ असे कोकण परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहितकुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपअधीक्षक शिवाजी पाटील उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:13 AM 27-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here