जिल्हयात सीसीटीव्ही कॅमेरे विथ स्पिकर बसविणार

0

त्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील बारीक-सारीक घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हयात तब्बल ७ हजार ५०० सीसीटीव्ही कॅमेरे विथ स्पिकर बसविण्यात येणार आहे. स्पिकर बसवल्याने एखादी व्यक्ती कायदयाचा उल्लंघन करत असेल तर नियंत्रण कक्षात बसूनच संबंधित ठिकाणी सूचना करण्यात येईल. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांना वचक बसेल, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी त्यांच्यासोबत पोलिस उपमहानिरीक्षक संजय मोहिते देखील उपस्थित होते. पोलिस उपमहानिरीक्षक संजय मोहिते हे शुक्रवारी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. या वेळी पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी सीसीटीव्ही विथ स्पिकर या मास्टर प्लॅनविषयी माहिती दिली. जिल्ह्यात तब्बल ७५०० सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्पिकर बसविण्यात येणार आहेत. कोणी नियम मोडताना आढळल्यास त्याला केवळ पाहून कारवाई नाही तर त्वरित त्याला सूचना करता यावे जेणेकरुन सार्वजनिक ठिकाणी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल आणि आपले नाव पुकारले जावू नये, याची भीती निर्माण होईल, या उद्देशाने सीसीटीव्ही बरोबर स्पीकर देखील बसविले जाणार आहे. यावर नियंत्रण कक्षातून आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनातून लक्ष ठेवले जाणार आहे. या प्रकल्पाचे सविस्तरपणे नियोजन डॉ. मोहितकुमार गर्ग करीत आहे. जिल्हयातील सर्व बीचेसवरही ‘सीसीटीव्ही कॅमेरे विथ स्पीकर’ बसविले जाणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:04 PM 27-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here