ओबीसी दाखल्यासाठी गृह चौकशी हाच पुरावा : शब्बीर अन्सारी

0

रत्नागिरी : ओबीसी दाखल्यासाठी पुराव्यासाठी इतर कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नसून गृहचौकशी हाच खरा पुरावा, अशी माहिती ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी दिली. शहरातील राजिवडा येथे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गायझेशन, रत्नागिरी जिल्हा शाखा आणि जमातुल मुस्लिमिन राजिवडा कोअर कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जनजागृती मोहिमेच्या सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, गावचा सरपंच किंवा तलाठी यानी लिहून दिल्यास त्यांना दाखला देणे गरजेचे आहे. त्यासाठी तलाठ्याकडून गृह चौकशी आवश्यक असल्याचे अन्सारी यांनी सांगितले. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गायझेशन ही संघटना मुस्लिमांचे मूळ प्रश्न मांडण्याचे आणि सोडविण्याचे काम करत आहे. या समाजाचा सर्वात महत्वाचा प्रश्न शिक्षण हा आहे. शिक्षण नसेल तर पुढील सर्व रस्ते बंद होतात. शिक्षणासाठी अनेक सवलती आहेत. त्या मिळत नसतील तर काय फायदा आहे. त्यासाठी व मुस्लिमांच्या अन्य प्रश्नासाठी आपली लढाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ओबीसी ऑर्गायझेशनचे जिल्हाध्यक्ष हरीस शेकासन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच जमातुल मुस्लिमिन राजिवडा कोअर कमिटीचे अध्यक्ष नजीर वाडकर, ओबीसी ऑर्गायझेशनचे सल्लागार शेखअहमद हुश्ये, उपाध्यक्षपद शब्बीर भाटकर, निसार दर्वे, इमरान सोलकर, बांदिरकर आणि महिलांनी ओबीसी बाबतच्या समस्या, प्रश्न, अडचणी मांडल्या. यावेळी ओबीसी ऑर्गायझेशनचे जमुरत अलजी, कोअर कमिटीचे सईद फनसोपकर, सचिव शफी वस्ता, रहिम दलाल, सलाउद्दिन सुवर्णदुर्गकर, लुकमान कोतवडेकर, बच्चू काद्री व अन्य उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:15 PM 27-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here