‘गोगटे-जोगळेकर’मध्ये जॉब स्कील कोर्स

0

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर डेव्हलपमेंट आणि प्लेसमेंट सेलमार्फत महाविद्यालयामध्ये जॉब स्कील डेव्हलपमेंट आणि इतर कोर्सेस सुरू करण्याचे योजिले आहे. याचाच भाग म्हणून रत्नागिरीतील धैर्य अकादमीच्या कंपनी सर्टिफाईड ट्रेनर डॉ. पुजेश्वरी कदम यांच्या सहकार्यान महाविद्यालायत डिसेंबर २०२१ मध्ये जॉब स्कील डेव्हलपमेंट कोर्स सुरू केला जाणार आहे. जॉब स्कील डेव्हलपमेंटचा कोर्स तीन महिने कालावधीचा आहे. हा कोर्स विद्यार्थ्यांना निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन सुरू असून लवकरच ट्रेनिंग सेंटर कार्यान्वित होणार आहे. अधिक माहितीसाठी डॉ. रुपेश सावंत, डॉ. उमेश सकपाळ, डॉ.रामा सरतापे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:30 PM 29-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here