‘नाणार’: कोकणात 22 शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

0

कोकणातील नाणार रिफायनरीवरून शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे. रिफायनरीला समर्थन करणाऱ्या विभागप्रमुखावर शिवसेनेने कारवाई केली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ कोकणातील सागवेसह विभागातील तब्बल 22 शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिली आहेत. सागवे आणि इतर गावातील शिवसैनिकांच्या बैठकीत शिवसेनेच्या 22 शाखा प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, नाणार रिफायनरी प्रकल्पाला संघटनेच्या नियमानुसार दिलेल्या पाठिंब्यामुळे शिवसेना सागवे विभागप्रमुख राजा काजवे यांची पक्षाने तडकाफडकी विभागप्रमुखपदावरुन जिल्हाप्रमुखपदी उचलबांगडी करण्यात आली आहे. शिवसेनेने राजा काजवे यांच्यावर कारवाई केल्याच्या निषेधार्थ विभागातील शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी सामुहीक राजीनामे दिले आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here