गुहागर : एसटी बस अडवणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

0

गुहागर : राज्यात काही ठिकाणी माघार तर काही ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही चालूच आहे. सरकारच्या आवाहनास प्रतिसाद देत काही ठिकाणचे कामगार कामावर हजर झालेत तर काहीजण विलीनीकरणाच्या मागणीवर अजूनही ठाम असल्याचे दिसत आहे. याच दरम्यान कामावर हजर झालेल्या कामगारांच्या मदतीने एसटी सेवा पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. अशाच प्रयत्नात गुहागर ते चिपळूण मार्गावर धावणारी गाडी मनसे कार्यकर्त्यांनी अडवाल्याची घटना घडली आहे. हि गाडी शृंगारतळी येथे आली असता मनसे कार्यकर्त्यांनी ती अडवली व एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या जो पर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही एसटी चालू देणार नाही असे बोलून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, राज साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है अश्या घोषणा देऊन एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्यापासून परावृत्त केले असे तक्रारीत म्हणण्यात आले आहे. गुहागर पोलीस स्थानकात हि तक्रार एसटी कर्मचारी दिनेश पर्शुराम ओक यांनी दिली असून त्यानुसार मनसे गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर, विवेक सुरेश शिर्के, कौस्तुभ विवेक कोपरकर, शेखर सुधीर पाटील, सुशांत सदानंद कोळंबेकर, शैलेश सीताराम बामणे, वैभव रमेश घाडे यांच्यावर भा.दं.वि.क. ३५३,३४१,१४३,१४७,१४९ म. पो. अधि ३७(१)(३),१३५ अन्वये गुहागर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here