राजापूर : पाचल जिल्हा परिषद गटातील मनसेचे विभाग अध्यक्ष सचिन पांचाळ व हरळ गावातील ग्रामस्थांनी आमदार डॉ. राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये नुकताच जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार डॉ. साळवी यांनी शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. आमदार साळवींच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत या मंडळींनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले. हरळ ग्रामपंचायत हद्दीतील मंगेश राऊत, अविनाश राऊत, नरेंद्र गुरव, स्वप्निल राऊत, जयेश साळवी, विनोद लांजेकर, दीपेंद्र साळवी, सुशांत सावंत, अक्षय राऊत आदींनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, उपजिल्हा महिला आघाडीच्या दर्वा तावडे. सभापती अमिता सुतार, विभागप्रमुख गणेश तावडे, विभागीय संघटक उमेश पराडकर, सरपंच माधवी पांचाळ, शाखाप्रमुख मंगेश पांचाळ, आत्माराम सुतार, उपविभागप्रमुख नीतेश सावंत आदी उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:34 PM 29-Nov-21