प्राथमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन

0

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे ३ ऑगस्टला दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेसमोर प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शिक्षक संघाकडून वारंवार विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले होते. या मागण्यांमध्ये बारा वर्षे पूर्ण झालेल्या सर्व शिक्षकांना तातडीने व विनाअट चटोपाध्याय मंजूर करणे, चोवीस वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना निवड श्रेणी मंजूर करणे, पोषण आहाराची बिले वेळेत देणे, पोषण आहार माल चांगल्या दजार्चा व वेळेत पुरवठा करणे, जिल्हा परिषद फंडाची कर्ज प्रकरणे वेळेत निकाली काढणे, वैद्यकीय बीले वेळेत निकाली काढणे, संप कालावधीचे कापून घेतलेले वेतन पुन्हा देणे, सर्व तालुक्यांचे वेतन एक तारखेलाच वितरित करणे, सर्व शासकीय आदेश व परिपत्रके सर्व शाळांना लेखी स्वरूपात देणे, कामगिरीचे धोरण निश्चित करून त्या प्रमाणेच कामगिरी काढावे. पदवीधर, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी पदी तत्काळ पदोन्नती देणे आदी मागण्यांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष विकास नलावडे, जिल्हा सरचिटणीस दिलीप देवळेकर, शांताराम पवार व सर्व तालुका अध्यक्ष यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here