महिला खासदारांसोबतच्या सेल्फीवरून शशी थरूर वादात

0

नवी दिल्ली : सहा महिला खासदारांसोबतची एक सेल्फी सोशल मीडियावरून शेअर केल्यानंतर काँग्रेसचे नेते शशी थरूर हे सोमवारी वादाच्या भोवऱ्यात सापडले. सेल्फीखाली ‘कोण म्हणते लोकसभा ही काम करण्यासाठी आकर्षक जागा नाही’ अशी कॅप्शन थरूर यांनी दिली होती. सोशल मीडियावर टोल झाल्यानंतर थरूर यांनी माफी मागितली. महिला खासदारांनी ही सेल्फी गमतीत घेतली होती व त्यांनीच ती शेअर करण्यास सांगितली होती, तथापि याबाबत माफी मागत असल्याचे थरूर यांनी स्पष्ट केले. थरूर यांच्यासोबत सेल्फीमध्ये ज्या महिला खासदार होत्या, त्यात सुप्रिया सुळे (बारामती), परनीत कौर (पतियाळा), थमीजाची थंगापांडियन (दक्षिण चेन्नई), मिमी चक्रवर्ती (जादवपूर), नुसरत जहां (बशीरहाट) व एस. ज्योतीमणी (करूर) यांचा समावेश होता.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:05 PM 30-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here