मुंबईतील शाळा 15 डिसेंबरपासून सुरू होणार

0

राज्यातील प्राथमिक शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असला तरी मुंबईत मात्र, 15 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू होणार आहेत. मुंबई महापालिका शिक्षण अधिकाऱ्यांनी पहिली ते सातवी शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्तांकडे पाठवला होता. त्यावर चर्चा झाली आणि त्यानंतर मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळा या उद्यापासून सुरू करता 15 डिसेंबरपासून सुरू करण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरू होईपर्यंत ऑनलाइन वर्ग सुरूच राहणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:54 PM 30-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here